आमची यशोगाथा
1. गावाविषयी माहिती
कासटवाडी हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ९९% आदिवासी लोकवस्ती असलेले प्रगतशील गाव आहे.कासटवाडी पैकी बाळकापरा येथे प्रसिद्ध जयेश्वर महादेवाचे मंदिर आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ९३२९ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ११, अंगणवाडी केंद्रे १७ व व्यायामशाळा ३,सभामंडप-२ आणि बहुउद्देशीय केंद्र -४ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ०६ मंदिरे, सामुदायिक सभागृह ०४, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
1. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून,भात,नागली व वरई ही प्रमुख पिके घेतली जातात. काजू व आंबा या फळपिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते
2. कासटवाडी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कासटवाडी गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे.
3. ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच व १३ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
4. कासटवाडी गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
2. भौगोलिक स्थान
कासटवाडी हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य क्षेत्रफळ ८५८७२ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ५ वार्ड आहेत. एकूण २१०१ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ९३२९ आहे. त्यामध्ये ४६०० पुरुष व ४७२९ महिला यांचा समावेश होतो.ग्रामपंचायत कासटवाडी हद्दीत ८ महसुली गावे व १२ पाडे आहेत.सर्व गाव पाडे हे विखुरलेल्या स्वरूपात असून ग्रामपंचायत मुख्यालयापासून १५ km अंतरापर्यंत वसलेले आहेत.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन कमी प्रमाणात आहे.तसेच गणेशनगर गावालगत अवघ्या १ किमी अंतरावर जव्हार शहराला पाणीपुरवठा करणारा शिवकालीन जयसागर धरण आहे. भांगरेपाडा,देवीचापाडा ,हाडे ,चोंढीचा ओहोळ आणि धानीचा ओहोळ वाहत जात असून पुढे सूर्या नदीला जाऊन मिळतात तसेच आडखडक गावालगत सूर्या नदी वाहत असते त्या नदीच्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जातो व आडखडक हे गाव मिरची उत्पादनात प्रसिद्ध आहे . येथे हवामान दमट उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १८°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
कासटवाडी क्षेत्रातील मिरची,काजू,आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
3. लोकजीवन
कासटवाडी गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून मिरची,काजू,आंबा, व हंगामी भात,नागली,वरई पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
गावात आदिवासी समाजाची सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कासटवाडीच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
5. संस्कृती व परंपरा
कासटवाडी गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गरदवाडी गावात हनुमानाचा बोहाडा हा हनुमान जयंतीला ला मोठ्या उत्साहात ३ दिवस भरवली जाते त्यात प्रामुख्याने विविध देवी देवतांची रूपे धारण करून मिरवणूकचे आकर्षण आहे ,तसेच बाळ कापरा गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रीला धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे सोनगाव गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
5. प्रेक्षणीय स्थळे:-
6. जयेश्वर मंदिर – बाळ कापरा गावातील प्रमुख जागृत महादेवाचे मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी महाशिवरात्रीला धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.व यात्रा भरवली जाते.
7. सातीमाळचा डोंगर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर बारव ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
8. केशराचा कडा – सोनगाव द्राक्ष उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.
7. जवळची गावे
कासटवाडी गाव जव्हार तालुक्यातील जव्हार नगर परिषद लगतचे प्रमुख ठिकाण असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत.
जव्हार शहर, जुनी जव्हार,गोरठण,डेंगाची मेट,वाळवंडा,आणि आयरे हि गावे कासटवाडीच्या आसपासची प्रमुख गावे आहेत.